Home /News /maharashtra /

सोलापुरात मॅरेथॉन सुरू होण्याआधीच गॅस सिलिंडरचा स्फोट, चार जखमी

सोलापुरात मॅरेथॉन सुरू होण्याआधीच गॅस सिलिंडरचा स्फोट, चार जखमी

सोलापुरात हाफ मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे

सोलापूर,5 जानेवारी: सोलापुरात हाफ मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. फुग्यात हवा भरण्यासाठी आणलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. गॅस भरणाऱ्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये एका महिलेसह 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. सोलापूर शहर पोलिस दलाच्या बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तपासणी सुरू आहे. मिळालेली माहिती अशी की, सोलापूर शहरात रविवारी एका संस्थेन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिसरात सुमारे पाच हजारांहून जास्त धावपटू आले होते. या दरम्यान फुग्यात हवा भरण्यासाठी आणलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्टोटाचा आवाज होताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोध पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Breaking news

पुढील बातम्या