Home /News /maharashtra /

‘मुख्यमंत्री साहेब डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा’; बारामतीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

‘मुख्यमंत्री साहेब डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा’; बारामतीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

फाईल फोटो

फाईल फोटो

अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा.तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरु आहे.

बारामती 27 ऑगस्ट: दुधाच्या प्रश्नावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट बारामतीत जाऊन आंदोलन केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांवर जोरदार हल्ला बोल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री साहेब डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा. अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरु आहे अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना बारामतीत लक्ष्य केले. दुधाच्या दरात घसरण होण्यास प्रामुख्याने लॉकडाऊन व पर्यायाने केंद्रसरकारच कारणीभूत आहे,  लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाचा भाव किमान चाळीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असता. लॉकडाऊन झाल्याने दुधाचा खप चाळीस टक्क्यांनी खाली आला, त्या मुळे दुधाचे भाव पडले. जर केंद्राच्या लॉकडाऊनमुळे दुध उत्पादकांचे नुकसान होत असेल तर सर्वात आधी केंद्राने मदतीसाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आंदोलनासाठी आल्यानंतर शारदा प्रांगणात माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही भूमिका बोलून दाखवली. केंद्राने वास्तविक मदतीसाठी पुढे यायला हवे होते, प्रत्यक्षात केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या