माजी उपमुख्यमंत्र्यांच्या साखर कारखान्याचा लिलाव, विरोधकानेच जिंकली बोली

माजी उपमुख्यमंत्र्यांच्या साखर कारखान्याचा लिलाव, विरोधकानेच जिंकली बोली

साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणाचे दिवस आता संपले असून उलट राजकारणीच आता अडचणीत येत आहेत.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर 23 ऑक्टोंबर : महाराष्ट्राचं राजकारण हे कधी काळी साखर कारखान्याभोवती फिरत असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणाचे दिवस आता संपले असून उलट राजकारणीच आता अडचणीत येत आहेत. कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विजय शुगर्स या साखर कारखान्याचा आज लिलाव झाला. या लिलावामुळे बँकेचं एनपीए कमी होणार आहे. मोहिते पाटील यांचे विरोधक आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनीत हा कारखाना विकत घेतलाय.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याची प्रचंड राजकीय चर्चा झाली होती.

रोहित पवार जिंकणार तर परळीत टफ फाईट, महाराष्ट्राच्या 20 जागांचा नवा EXIT POLL

अडचणीत असलेले साखर कारखाने, बँकांचं थकलेलं कर्ज यामुळे सरकारचं पाठबळ राहावं यासाठी मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असंही बोललं जावू लागलं. विजय शुगर्सवर होते 183 कोटींचे कर्ज होतं. ते फेडणं शक्य नसल्याने शेवटी कारखान्याचा लिलाव करावा लागला. मोहिते पाटील यांचे राजकीय विरोधक बबनराव शिंदे यांनी हा कारखाना घेण्यासाठी सर्व शक्ती लावली होती. त्यांनी चढी बोली लावत 125 कोटीत कारखाना विकत घेतला. हा कारखाना घेण्यावरूनही राजकारण झालं.

निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, 5000 लाडूंची ऑर्डर!

उद्या होणार फैसला

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading