कोल्हापुरात हाहाकार.. नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, 51 हजार नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापुरात हाहाकार.. नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, 51 हजार नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापुरात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. नौसेना, कोस्टगार्डची तातडीने मदत घेण्यात येत आहे. महापुरामुळे शहरातल्या अनेक इमारतींच्या खाली 10 ते 15 फूट इतके पाणी साचले आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, (प्रतिनिधी)

कोल्हापूर, 7 ऑगस्ट- कोल्हापुरात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. नौसेना, कोस्टगार्डची तातडीने मदत घेण्यात येत आहे. महापुरामुळे शहरातल्या अनेक इमारतींच्या खाली 10 ते 15 फूट इतके पाणी साचले आहे. अनेक उद्योग-व्यवसायांचही नुकसान झाले आहे. मार्गही बंद झालेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 नागरिकांनी स्थलांतरीत करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी खास विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात 16 जणांचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात सध्या पुराने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 1 लाख 40 हजार बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यात 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Ndrf ची 10 पथके सध्या कार्यरत आहेत. या पुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण कारणीभूत नाही तर अतिवृष्टी आणि दुधगंगा, पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या बॅक वॉटरच्या फुगवट्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती 5 जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

कोल्हापूरमधील शिवाजी पुलाजवळचे पंचगंगा नदीचे पाणी अथांग पसरले आहे. लष्कराकडून बचाव कार्य करण्यात येत आहे. नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल झाले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. लष्कराचे एक पथक रात्री दोन बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. महामार्गावर जास्त पाणी असल्याने अडचण निर्माण झाली. पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले आहे. तर शहरासाठी दोन बोटींसह मदत सुरु झाली आहे. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जिवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

बाजारपेठ चार दिवसांपासून पाण्यात...

चंदगड तालुक्यातील कोवाड येथील बाजारपेठ चार दिवसांपासून पाण्यात आहे. त्यामुळे सुमारे 2 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेकडो नागरिक ताम्रपर्णी नदीच्या महापूराने वेढलेल्या घरात अडकले आहेत. नदीचे पाणी शेतवडीतील या दुकानातही शिरले असून वरच्या मजल्यावरील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यापैकी 15 महिलांसह 31 जणांना गडहिंग्लज नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने यांत्रिक बोटीने सुरक्षित ठिकाणी हलविले. परंतु, अजूनही शेकडो नागरीक घरातच अडकले आहेत.

पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 3:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading