बारामतीला पावसाने झोडपलं, रस्त्यांवर वाहिले पाण्याचे पाट

बारामतीला पावसाने झोडपलं, रस्त्यांवर वाहिले पाण्याचे पाट

गेल्या कित्येक वर्षात असा पाऊस फक्त काही दिवसांमध्ये झाला नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

  • Share this:

जितेंद्र जाधव 21 ऑक्टोंबर : बारामतीत शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या  मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे शहरातील  रस्ते जलमय झाले आहे होते. MIDC येथील  विद्यानगरी परिसरात पावसाच्या पाण्याने रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरुप आले होते. त्यामुळे  रविवार सुट्टीचा दिवस आसल्याने नागरिकांनी घरी रहानेच पसंत केलंय. मात्र जर सोमवारी म्हणजे मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबरला असाच पाऊस राहील्यास मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो. बारामती तालुक्यातच हा पाऊस होता. गेल्या कित्येक वर्षात असा पाऊस फक्त काही दिवसांमध्ये झाला नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. जोरदार पावसाने फलटण- बारामती हा राज्यमार्ग बंद झालाय.  पाहुणेवाडी येथील चारीला पाणी आल्या मुळे पुलावरून पाणी जात आसल्याने वाहतूक वळवण्यात आलीय.

Amazonचा सगळ्यात मोठा Diwali Sale उद्यापासून, Smart Phone वर जबरदस्त ऑफर

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बारामती  तालुक्यातील आपल्या गावी काटेवाडी येथे सकाळी 7 वाजता मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. सकाळी संपुर्ण कुटुंबीयांसह ते  मतदान करणार आहेत. तर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार बारामतीत मतदान करणार आहेत. विधानसभेच्या संपूर्ण मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर रोहित पवार बारामतीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

बैलगाडीतून मतपेट्यांचा प्रवास

शिरूर - लोकशाहीचा उत्सव अर्थात विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला 'डिजिटल' समजलेल्या इंडियातील एक वास्तव समोर आले आहे. चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून मतदान यंत्र अर्थात EVM चक्क बैलगाडीतूनच न्यावे लागले आहे.

महाराष्ट्राच्या तरुणाचं स्वप्न पूर्ण होणार,थेट PM मोदींनी घालतं प्रकल्पात लक्ष

धक्कादायक म्हणजे हा काही आदिवासी किंवा डोंगराळ भाग नसून पुणे जिल्ह्यातील विकसित समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुका आहे.तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील तांबूळ ओढा आणि दराखे वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्तावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य आहे. रविवारी 173 बुथ क्रमांक असलेल्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी अधिकाऱ्यांना चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला. या रस्ताबाबतीत नागरीकांनी वेळोवेळी तक्रारी देखील केल्या होत्या.

'त्या' वादानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

या रस्तासंदर्भात स्थानिक नागरीकांनी गेले 7 ते 8 वर्षे, शिरूर तहसील कार्यालयात आणि तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले असून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याठिकाणी शाळा आहे. लहान मुलांना व ग्रामस्थांना येण्याजाण्यासाठी खूप त्रास होत आहे. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते, असेही स्थानिक नागरिक सांगत आहेत. दरम्यान, शिरुर मतदार संघात मागील 7 वर्षांपासून बैलगाडी शर्यती उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद आहेत. आज त्याच बैलगाडीचा वापर मतदान यंत्र अर्थात EVM घेऊन जाण्यासाठी करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading