पूरग्रस्तांची थट्टा! मदतीसाठी दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात केले पुन्हा वसूल

पूरग्रस्तांची थट्टा! मदतीसाठी दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात केले पुन्हा वसूल

'घरं दारं वाहून गेल्याने आधीच लोक दुखवलेले आहेत. गुरं-ढोरं वाहून गेलीत. शेती खरडून गेली त्यामुळे लोक अजुनही दु:खात आहे. असं असताना मदत नको पण थट्टा करू नका.'

  • Share this:

संदिप राजगोळकर, कोल्हापूर 21 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावात पूरग्रस्तांना दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल करण्याचा अजब प्रकार समोर आलाय. पूरग्रस्त कोण हेच प्रशासनाला समजलं नसल्यानं घडलेल्या या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे. महापुराचा फटका रांगोळी गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यानंतर 100 टक्के गाव पूरग्रस्त घोषित करत सर्वाना 5 हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मात्र त्यानंतर पूरग्रस्त आणि पुरबाधीत या शब्दरचनेत प्रशासन अडकल्याने हे पैसे पुन्हा वसूल करण्यात आलेत. मात्र हे करत असताना पोलीस बंदोबस्तात वसुली झाल्याने नागरिक संतप्त आहेत.

'देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल'

प्रशासनाने सर्व्हे न करता ही मदत दिल्याने गोंधळ उडाल्याची चूक कबूल केलीय. आता पुन्हा सर्वेक्षण करून मग मदत देऊ असे सरकारी उत्तर अधिकारी देत आहेत. मात्र ही पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पुरग्रस्तांना मदत म्हणून रोख 5 हजार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार या मदतीचं वाटप करण्यात आलं. मात्र इथेही सरकारी पद्धत आडवी आली. हे वाटप सरसकट आहे की कसं याची शहानिशा न करता वाटप करण्यात आल्यानं सगळ्यांनाच पैसे देण्यात आले.

खबरदार! गणेशोत्सवात वर्गणीसाठी जबरदस्ती केली तर खंडणीचा गुन्हा लागणार

कोल्हापूर, सांगली, कराड या भागात आलेल्या महापुरानं सगळचं वाहून गेलं, संसार उघड्यावर पडलेत. घरातली कागदपत्र वाहून गेली. त्यामुळे लोकांकडे आता शिल्लक काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे सरकारी पद्धतीन न अडकता सर्वांना तातडीनं मदत व्हावी यासाठी रोख मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. घरं दारं वाहून गेल्याने आधीच लोक दुखवलेले आहेत. गुरं-ढोरं वाहून गेलीत. शेती खरडून गेली त्यामुळे लोक अजुनही दु:खात आहे. असं असताना जर प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीने मदत देत असतील तर ते त्या दु:खाची खिपली काढण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या