Home /News /maharashtra /

तुरुंगाचे छत फोडून 5 अट्टल आरोपी पळाले, बलात्कार आणि हत्येचे होते आरोप

तुरुंगाचे छत फोडून 5 अट्टल आरोपी पळाले, बलात्कार आणि हत्येचे होते आरोप

पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी खास पथकं स्थापन केली आहेत.

अहमदनगर 10 फेब्रुवारी : हत्या आणि खुनाचे आरोप असलेल्या 5 अट्टल गुन्हेगार तुरुंगातून पळाल्याची खळबळजनक घटना घडलीय. कर्जतच्या उपकारागृहातून हे 5 कैदी पहाटे पसार झाले. जेलच्या छताची कौल काढून आणि छत फोडून हे आरोपी पसार झालेत. या आरोपींवर 302 सारखे आरोप होती. अट्टल गुन्हेगार असलेले आरोपीच पळाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानदेव कोल्हे (नानज जवळा, ता. जामखेड), अक्षय राऊत (पारेवाडी, अरणगाव), मोहन भोरे (कवडगाव, ता. जामखेड), चंद्रकांत राऊत (पारेवाडी, ता. जामखेड), गंगाधर जगताप (महाळगी, ता. कर्जत) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय राऊत, मोहन भोरे व चंद्रकांत राऊत हे खुनाच्या गुन्ह्यात, तर गंगाधर जगताप बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत होता. फरार आरोपींच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या आरोपींना पुन्हा ताब्यात घेणं आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणं याला प्राधान्य असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हेही वाचा... पुण्यात छपाक? अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून पिंपरीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या वर्षभरापूर्वी केली भाऊजीची हत्या, जामिनावरचा आरोपी उठला बहिणीच्या जीवावर
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या