पहिलीतला मुलगा करतो अश्लील कृत्य? शाळेने प्रवेश केला रद्द

पहिलीतला मुलगा करतो अश्लील कृत्य? शाळेने प्रवेश केला रद्द

असं काही असेल तर अशा मुलांना शाळेतून काढणं हा उपाय नसून तज्ज्ञांच्या समुपदेशनाने अशा मुलांवर उपचार करता येतो असा दावा मानसोपचार तज्ज्ञांनी केलाय.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, पंढरपूर16 सप्टेंबर : पंढरपूरातल्या एका शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या एका विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेने रद्द केलाय. या कारवाईचं कारण आहे हा मुलगा शाळेतील विद्यार्थीनी आणि शिक्षिकांशी अश्लील चाळे करत असल्याचं शाळा प्रशासनाने म्हटलंयय शाळेतील शिक्षकांनी पालकांना तसं लेखी पत्रही दिलंय. यामुळे मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. तर अशा मुलांना शाळेतून काढणं हा उपाय नसून तज्ज्ञांच्या समुपदेशनाने अशा मुलांवर उपचार करता येतो असा दावा मानसोपचार तज्ज्ञांनी केलाय.

पंढरपूरातल्या फिनिक्स इंग्लिश मीडियम शाळेतला हा प्रकार आहे. पहिली पासून इंग्रजी माध्यमातून इथं शिक्षण दिलं जातं. पंढरपूरातील एका सहा वर्षांच्या मुलाला राईट टू एज्युकेशन कायद्याच्या माध्यमातून जून महिन्यात या शाळेत प्रवेश मिळाला. मोफत शिक्षण मिळणार असल्यानं पालकानाही आनंद झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अजुन 70 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक - महाजन

मात्र दोन दिवसापूर्वी शाळेतील शिक्षकांनी मुलाच्या पालकांना यांना शाळेत बोलावून घेतलं. मुलाबद्दल तक्रार असेल असं त्यांना वाटले. पण शिक्षिकांनी जे सांगितले त्याने पालकांचा विश्वास बसला नाही. सहा वर्षांचा पहिली च्या वर्गातील मुलगा शाळेतील विद्यार्थीनी आणि शिक्षिकेशी सुद्धा असभ्य आणि अश्लील चाळे करत असल्याचं त्यांनी सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला. यामुळे मुलाचा शाळेतील प्रवेशही रद्द करण्यात आल्याचं पत्र पालकांना देण्यात आलंय.

याबाबत संबधित शाळेशी संपर्क केला असता तेथील शाळेचे को ऑर्डिनेटर नागेश माळवे यांनी हा सर्व प्रकार खरा असून या मुलाच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. शाळेची गुणवत्ता खराब होऊ शकते. याचा विचार करून  त्याचा प्रवेश रद्द केल्याचं सांगितलं.

ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल! भाजप शिवसेनेत रस्त्यांवरून जुंपली

यामुळे मोफत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळला असतानाही सदर विद्यार्थ्यास आता या शाळेत शिक्षण घेता येणार नाही हे स्पष्ट झाल आहे. अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी शाळेत शिक्षा मिळते. पुन्हा शाळेत शिक्षण घेता येते. पण शाळेने केलेल्या आरोपांमुळे आता या विद्यार्थ्यास दुसरीकडे शिक्षण घ्यावे लागणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 16, 2019, 9:56 PM IST

ताज्या बातम्या