• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापूर: टोल नाक्यावरच गुन्हेगार आणि पोलिसांचा बेछूट गोळीबार, एकाला जागीच केलं ठार

कोल्हापूर: टोल नाक्यावरच गुन्हेगार आणि पोलिसांचा बेछूट गोळीबार, एकाला जागीच केलं ठार

मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. शिवाय या गोळीबारात काहीजण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 29 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली आहे. यावेळी एकमेकांवर झालेल्या बेछूट गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. शिवाय या गोळीबारात काहीजण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, आदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. पोलिसांना चकवा देत सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते. याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना पकडण्यासाठी कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता. रात्री 9 वाजता हे आरोपी किनी टोल नाक्यावर पोहोचले. गुन्हेगारांच्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. टोलनाक्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहेत. दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात महाराष्ट्राला हादरावून सोडणारी अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकमध्ये कळवणजवळ एसटी महामंडळाची बस आणि रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजूनही काही प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असं सांगण्यात येत आहे. कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.  त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका अॅपे रिक्षाला बसने धडक दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या परिसरात वळली. तिथूनच जवळ एक विहीर होती. त्यावेळी बस थेट रिक्षाला फरफटत नेते विहिरीच्या कठड्याला धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून  बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली.
Published by:Renuka Dhaybar
First published: