मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, कधीही होऊ शकते अटक

अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, कधीही होऊ शकते अटक

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे.

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे.

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे.

    जितेंद्र जाधव, बारामती, 20 जानेवारी : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे रंजन तावरे यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होताच कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांच्यावर 51 लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असतानाच कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने वातावरण चांगले तापले आहे. रंजन तावरे यांच्या समर्थकांनी आज सोमवार रोजी माळेगाव,पणदरे, सांगवी गाव बंद ठेवले आहे. माळेगाव कारखान्याचे संचालक आणि शरद ग्रामीण बिगरशेती पत संस्थेचे सभासद सुरेश खलाटे यांनी तावरे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 'संस्थेचे चेअरमन रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांनी माझ्यासह माझे सहकारी रामदास आटोळे, राजेंद्र बुरूंगले या तिघांच्या कोऱ्या कर्ज अर्ज प्रकरणावर, धनादेशावर सह्या घेऊन प्रत्येकी 17 लाख 10 रूपये, असे 51लाख 30 हजार रूपये कर्ज मंजूर करून संस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांनी परस्पर काढून घेतले,' अशी तक्रार खलाटे यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या महाअधिवेशानाआधी मोठा धमाका होणार? नेत्याने घातली शिवसैनिकांना साद सदरचा गुन्हा विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे तावरे समर्थकांनी सदरचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून काही गावे बंद ठेवून निषेध केला आहे. अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली निवडणूक माळेगाव कारखाना हा भाजपच्या ताब्यात असल्याची खदखद पवार कुटुंबीयांच्या मनात असल्याचं दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचाच असा चंग दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 'मागील पाच वर्षापासून आपले नेते शरद पवार हे माळेगाव कारखान्यात गेले नाहीत. त्यांनी सन्मानाने कारखान्यात जावे अशा पद्धतीचे आपण काम करायचे आहे,' असं अजित पवार सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ajit pawar, Baramati

    पुढील बातम्या