शिक्षिकेशी अश्लिल कृत्य करतो म्हणून रद्द केला होता मुलाचा प्रवेश, संस्थाचालकावर गुन्हा

शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा शाळेतील प्रवेशर रद्द करण्यात आला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 05:07 PM IST

शिक्षिकेशी अश्लिल कृत्य करतो म्हणून रद्द केला होता मुलाचा प्रवेश, संस्थाचालकावर गुन्हा

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर, 19 सप्टेंबर: शाळेत डोळा मारतो..शिक्षिकेशी अश्लील, लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेऊन पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलाला शाळेतून काढल्याप्रकरणी संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी बालहक्क संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्याला पुन्हा शाळेत घेतले आहे.

'News 18 Lokmat'ने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांत दाद मागितली होती. अखेर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी संबंधित संस्था चालकावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा ठपका ठेवत फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा शाळेतील प्रवेशर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली होती. अखेर पोलिसांनी बालहक्क संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 75 नुसार संस्थाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलाला दिलेल्या नोटिशीतील मजकुरामुळे त्याच्या भविष्यातील शैक्षणिक व मानसिक जडणघडणीवर परिणाम होणार असल्याने व्यवस्थापनावर कलम 75 जेजे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. पीडित मुलाचे पालक चहाची टपरी चालवत असून, शिक्षण हक्क कायद्यामुळे मुलाला या शाळेत मोफत प्रवेश मिळला होता. संबंधित शाळेचे कोऑरडीनेटर नागेश माळवे यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिकदृष्ट्या संबंधित मुलाचा प्रवेश रद्द केलेला नसून संस्थेला प्रकरासंबधीत कोणतीही कायदेशीर नोटीस मिळाली नाही असे सांगितले.

VIDEO:मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...