पाऊस पडला पण कृत्रिम.. ढगांवर रसायनाची फवारणी करताच पाथर्डीत दमदार पाऊस

पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्याने तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 09:15 AM IST

पाऊस पडला पण कृत्रिम.. ढगांवर रसायनाची फवारणी करताच पाथर्डीत दमदार पाऊस

साहेबराव कोकणे, (प्रतिनिधी)

अहमदनगर, 23 ऑगस्ट- पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्याने तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

यंदा जूननंतर समाधानकारक पाऊस पडला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असली तरी तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळ कायम आहे. अद्याप अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरपर्यंत दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

दरम्यान, 9 ऑगस्टपासून सुरू केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला आता काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. अमेरिकेहून आलेल्या विमानाने मराठवाड्याच्या आकाशात घिरट्या घालायला सुरुवात केली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या पावसाने यावर्षीचा मराठवाड्यातील दुष्काळ तर संपणार नाही. पण प्रयोगाला येत असलेल्या यशामुळे बारा महिने दुष्काळी झळा सोसणारा मराठवाड्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

SPECIAL REPORT: प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण; गावकऱ्यांनी काढली धिंड

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...