बलात्काराच्या घटनेनं हादरला उपमुख्यमंत्र्याचा तालुका, 9 वर्षांच्या मुलीवर वडिलांनीच केली जबरदस्ती

बलात्काराच्या घटनेनं हादरला उपमुख्यमंत्र्याचा तालुका, 9 वर्षांच्या मुलीवर वडिलांनीच केली जबरदस्ती

या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सावत्र वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

बारामती, 09 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातच बलात्कारची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बापाने नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मोरगाव जवळील शेराचीवाडी येथे घडली असून या प्रकरणी तक्रार दाखल होताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी सावत्र बापाला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिक मागणी करत आहेत.

या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि कारवाई करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी शेराचीवस्ती इथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. या मुलीची आई जेजुरीची रहिवासी आहे सध्या लातूरमधील मोरगावात राहतात.

हे वाचा-मंदिराबाहेर पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; गावकऱ्यांचा विरोध करणं जीवावर

हे कुटुंब शेराचीवस्ती इथे भाड्यानं खोली घेऊन राहात होते. पीडित मुलीची आई या आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती मिळाली. या आरोपीनं 9 वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केला आणि कुणाला काही सांगितलं तर आईला जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष मुंढे,  हवालदार संजय मोहिते यांनी नराधम सावत्र बापाला अटक केली आहे. सध्या चौकशी सुरू असून संतप्त स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 9, 2020, 3:36 PM IST
Tags: baramati

ताज्या बातम्या