बापानेच पुसलं मुलीचं कुंकू, तलवारीने वार करून केली जावयाची हत्या

बापानेच पुसलं मुलीचं कुंकू, तलवारीने वार करून केली जावयाची हत्या

दागिन्यांवर झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयूर काळे याचा खून केला,

  • Share this:

श्रीरामपूर, 9 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारकडून देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने सरकारच्या महसुलात मोठी घट झाली. ही घट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत भर तर पडली, मात्र गुन्हेगारीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचार, मारहाण अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुठेवाडगाव इथं सासऱ्याने जावयाची हत्या केली आहे. भांडण झाल्यानंतर सासऱ्याने मित्रांच्या मदतीने जावयावर तलवार आणि इतर धारदार शस्र्यांनी वार करत त्याची हत्या केली. मयूर आकाश काळे (वय 28) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

वाचा - मुंबईत लष्कर येणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका

दागिन्यांवर झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयूर काळे याचा खून केला, अशी माहिती आहे. मुठेवाडगाव इथं शेती महामंडळाची पडीक जमीन आहे. या जमिनीत अतिक्रमण करुन बाहेरगावाहून आलेली चार कुटुंबे राहतात. आरोपी सचिन काळे हा येथेच राहून मोलमजुरी करतो. त्याचा जावई मयूर काळे हा मूळचा कर्जतचा असून तोदेखील सासूरवाडीलाच राहात होता. 5 वर्षांपासून त्याचे गावातच वास्तव्य होती.

काल आरोपी सचिन काळे याने जावई मयूर व त्याची पत्नी मोनिका या दोघांकडे दागिण्यांची मागणी केली. त्यातून भांडण झाले. हा वाद विकोपाला गेला. अखेर मित्राच्या मदतीने सासऱ्याने जावई मयूर काळे याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली.

वाचा - मुंबईच्या आणखी एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना मृतदेहांची झाली अदलाबदल

दरम्यान, याप्रकरणी मृत मयूर काळे याची पत्नी मोनिका काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात सासरा सचिन काळे (रा. मुठेवाडगाव, ता.श्रीरामपूर), संदिप काळे, (रा.भेंडाळा, ता.गंगापूर) व बुंदी काळे (रा. मिरजगाव, ता.कर्जत) व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले असून संदीप काळे हा फरार आहे.

मृत तरुणही होता वादग्रस्त

मृत मयूर काळे याच्याविरुद्ध पूर्वी चोऱ्याचे गुन्हे दाखल होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून तो मुठेवाडगाव येथे शेतमजुरीचे काम करत होता. गावात टाळेबंदी असतांना दारुची विक्री सुरु होती. त्यासंबंधी पोलिसांनी चौकशी केली होती. तसेच आरोपी सचिन काळे हा खिसे कापण्याचा धंदा करत होता. त्याची माहिती पोलिसांना मयत मयूर काळे हाच देतो, असा आरोपींचा समज होता. त्यातून मागील आठवडय़ात भांडणेही झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये दागिन्यांवरून वाद झाला आणि याच वादातून मयूर काळे याची सासऱ्याकडे हत्या करण्यात आली.

ऑनलाइन क्लासमध्ये मुलाने पोस्ट केला पॉर्न PHOTO, ग्रुपवर केलं अश्लील चॅट

First published: May 9, 2020, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या