अरेरे! Online शिक्षणासाठी वडिलांनी दिला नाही मोबाईल, 10वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अरेरे! Online शिक्षणासाठी वडिलांनी दिला नाही मोबाईल, 10वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

घरची परिस्थिती हलाकिची असल्याने व मोबाईल घेणे तात्काळ शक्य नसल्याने वडीलांनी आदर्शची समजूत घालून ते मोबाईल घेणं पुढे ढकलत होते.

  • Share this:

सांगली 14 जुलै:  जत तालुक्यातील मल्लाळ  येथे ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाईल मिळत नसल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय 15 ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सोमवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

आदर्श हराळे हा नुकताच इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जत शहरातील जत हायस्कूल येथे शिक्षण घेत होता. तो दहावीमध्ये प्रवेश घेणार होता. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे.. यामुळे जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मोबाईलवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

आदर्श यानेही आपल्या शेतकरी वडिलांकडे शिक्षणासाठी मोबाईलची मागणी करत होता. घरची परिस्थिती हलाकी व मोबाईल घेणे तात्काळ शक्य नसल्याने वडील आप्पासाहेब हराळे यांनी आदर्शची समजूत घालून मोबाईल घेणं पुढे ढकलत होते. मात्र, सोमवारी आदर्श यांने पुन्हा वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. वडिलांनी लवकरच घेऊ, असे सांगताच आदर्श नाराज झाला.

हेही वाचा - Online classesसाठी आता शाळांची मनमानी बंद, केंद्राने जाहीर केले नवे नियम

याच नैराश्याच्या कारणातून आदर्शने घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदर्शच्या वडिलांनीच पोलिसांना ही माहिती दिली आहे. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने आजच शाळांसाठी Online शिक्षण कसं घ्यावं यासाठी नियमावली जाहीर केली आहे.  पण ज्या मुलांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्यांनी काय करायचं असा सवाल अनेक तज्ज्ञ आणि पालक संघटनांनी केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 14, 2020, 9:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या