नगरमध्ये पारधी महिलेवर गॅंगरेप.. माजी महापौरांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा

नगरमध्ये पारधी महिलेवर गॅंगरेप.. माजी महापौरांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा

जागेच्या वादातून आदिवासी महिलेस मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, (प्रतिनिधी)

अहमदनगर, 18 ऑगस्ट- जागेच्या वादातून आदिवासी महिलेस मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा समावेश आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा.बुरडेमळा,नगर) यासह त्यांच्यासह अनोळखी पाच जणांचा समावेश आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान बुरुडगाव रोड येथील पडीक रानात आदिवासी समाजातील महिला बकऱ्या चारीत होती. त्यावेळी भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबतच जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही, असे म्हणून आरोपींनी महिलेस लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. मारहाणीत सदर महिला अर्धवट बेशुद्ध पडली असता गणेश फुलसौंदर व महेश फुलसौंदर यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. इतरांनी घेराव घातला व त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यास तुला व तुझे कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तसला' व्हिडिओ दाखवून सेल्स एक्झिक्युटिव्हने केला कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार

मुंबईमध्ये एका कार कंपनीत काम करणाऱ्या सेल्स एक्झिक्युटिव्हने कस्टमरच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्याम अभिमन्यू मस्के असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला माहिम येथून अटक केली आहे.

चुंबन घेतलं पण दुर्लक्ष केलं..

मिळालेली माहिती अशी की, आरोपी एका कार कंपनीत नोकरीला आहे. पीडितेच्या पतीने आरोपीच्या मध्यस्थीने कार खरेदी केली होती. या संदर्भात पीडितेने आरोपीची भेट घेतली होती. यावेळी आरोपीने पीडितेचे चुंबन घेतले होते. तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला बाहेर फिरायला बोलावले. दोघेही हॉटेलमध्ये गेले. तिथे त्याने तिच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळले. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर मोबाइलच्या कॅमेऱ्यात बलात्काराचे चित्रीकरणही केले.

'तसला' व्हिडिओ दाखवून केले ब्लॅकमेल

मुंबईतील एका जॉगर्स ट्रॅकवर काही दिवसांनी तो पीडितेला पुन्हा भेटला. त्याने तिला पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिला 'तो' व्हिडिओ दाखवला. एवढेच नाही तर तो पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही केले. भीतीपोटी पीडितेने आरोपीसोबत येण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर दोन-तीनदा बलात्कार केला. त्यानंतरही आरोपी तिला ब्लॅकमेल करतच होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला. तिच्या पतीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला माहिम येथील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त केला आहे. त्यात पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत.

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading