Home /News /maharashtra /

राजू शेट्टी वाढवणार सरकारच्या अडचणी, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारला बोचरा सवाल

राजू शेट्टी वाढवणार सरकारच्या अडचणी, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारला बोचरा सवाल

राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोचरा सवाल विचारत सरकारची कोंडी केली आहे.

    कोल्हापूर, 5 जानेवारी : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. या महाआघाडीमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मुद्यावरून राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोचरा सवाल विचारत सरकारची कोंडी केली आहे. 'सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वास शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही दिलं होतं. मग आता तुमचं सरकार आलं आहे. पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?' असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं निवडणुकीआधी अजित पवार म्हणाले होते. मग आता सातबारा कोरा का झाला नाही?' असा प्रश्न विचारत राजू शेट्टी यांनी सरकारला निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली, जयंत पाटलांनी केलं जाहीर 'कर्जमाफी करण्यासाठी पैसे नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. शिवारचं मोकळं पडणार असेल तर शिवथाळी आणणार कुठून?' असं विचारत राजू शेट्टी यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारकडून सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजू शेट्टी हे सरकारविरोधात अजून आक्रमक होणार हे निश्चित आहे. बाळासाहेब थोरात स्वीकारणार नाही 'ही' जबाबदारी, म्हणाले... दरम्यान, कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांची उपस्थिती होती. भारतीय किसान सभेच्यावतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी 8 जानेवारीला देशभर बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे. यावेळी ते केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधण्याची शक्यता आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ajit pawar, Raju Shetti, Uddhav thackeray

    पुढील बातम्या