सातारा, 13 मार्च: स्वतः भारताची महत्त्वाची तपास यंत्रणा असलेल्या 'रॉ' चा एजंट (Fake RAW agent in satara ) असल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणाला सातारा डीबीच्या पथकाने अटक केली आहे. हा तरुण पोलिसांची वर्दी (Police Uniform) घालून सातारा कास रत्यावरून स्पोर्ट बाईकने (Soprt Bike) फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संबंधित तरुणाला हटकले. यावेळी संबंधित तरुणाने आपण रॉ चा एजंट असल्याची माहिती पोलिसांना दिली. पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या आणि प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर संबंधित तरुणाचं पितळं उघडं पडलं आहे.
पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी तरुणाचं नाव नयन राजेंद्र घोरपडे असून तो सातारा जिल्ह्यातील गवडी या गावचा रहिवासी आहे. सध्या तो साताऱ्यातील शनिवार पेठेत रहातो. संबंधित 23 वर्षीय आरोपी तरुणाने आपल्या गावात आणि साताऱ्याती अनेकांजवळ आपण रॉ चा एजंड असल्याच्या बढाया मारल्या असल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी डीबी पथकाचे पोलीस हवालदार सुजित भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी तरुणाकडून पोलिसांची खाकी वर्दी जप्त करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च रोजी दुपारी 4 च्या सुमारास आरोपी तरुण सातारा-कास या रस्त्यावरून स्पोर्ट बाईकने जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. यावेळी आरोपी तरुणाने पोलिसांची वर्दी परिधान केली होती. त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आरोपी तरुणाला थांबवलं आणि आपण कोणत्या पोलीस ठाण्यात सेवेवर आहात अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीनं आपण रॉ चा एजंट असून दिल्ली येथे कार्यरत असल्याची खोटी माहिती दिली. पण पोलिसांना आरोपी तरुणावर संशय आला, त्यानंतर पोलिसांनी तरुणावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.
हे ही वाचा-बाळ बोठेच्या अटकेनंतर रेखा जरे हत्येप्रकरणी नवा ट्विस्ट,या कारणामुळे दिली सुपारी
पण या प्रश्नांची उत्तर देताना तरुण अडखळत होता. त्याला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणं जमलं नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला. त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांना दिली. हंकारे यांनी संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात घेवून येण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस चौकशीत आरोपी तरुणाने दिलेली माहिती बोनस असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Fake, Satara