सातवी पास तरुणाने Youtube व्हिडिओ बघून बनवल्या बनावट नोटा

सातवी पास तरुणाने Youtube व्हिडिओ बघून बनवल्या बनावट नोटा

बनावट चलनी नोटा तयार करण्याचे रॅकेट पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उघड केले.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात, (प्रतिनिधी)

पंढरपूर, 15 सप्टेंबर: बनावट चलनी नोटा तयार करण्याचे रॅकेट पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उघड केले. या प्रकरणी रणजीत सुखदेव राजगे (रा.कुसमोड, पिलीव, ता.माळशिरस) या बनावट नोटा तयार करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून बनावट 11 हजार रूपये, नोटा छापण्याची शाई, प्रिंटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले आहे. युटूबच्या युट्युब व्हिडिओ बघून त्याने बनावट नोटा तयार करण्याचे धाडस केल्याचे समोर आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत फिरत होत संशयास्पद...

गणेश विसर्जनच्या दिवशी पंढरपूर शहरात संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी केली असता बनावट नोटा तयार करत असल्याचे आरोपीने कबुली दिली. आरोपीकडून दोन हजार, पाचशे, शंभर,पन्नास अशा बनावट नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करत आहेत.

खोटं वय दाखवून वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समिती सदस्य बनला होता हा नेता!

वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात आलो.. वय वाढवून वयाच्या 17 व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो, असा गौप्यस्फोट खुद्द शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आमदार पाटील यांना हे वक्तव्य सांगोल्यात शेकापच्या मेळाव्यात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी नेते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कसा दुरूपयोग करू शकतात, हे जळजळीत वास्तव या निमित्तने जगासमोर आले आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळतो तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे पूर्ण व्हावी लागतात, असे असताना शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपण वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाल्याचे कबूल केले आहे. भावनेच्या भरात केलेल्या या वक्तव्यामुळे आमदार पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

VIDEO: भिवंडीतील गोदामात अग्नितांडव; गोदामातील कपड्याची राख

First published: September 15, 2019, 11:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या