भाजपमधून लढल्यामुळे विखे पाटील शिर्डीचा गड राखणार का? असा आहे EXIT POLLचा निकाल

भाजपमधून लढल्यामुळे विखे पाटील शिर्डीचा गड राखणार का? असा आहे EXIT POLLचा निकाल

288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो.

  • Share this:

शिर्डी, 21 ऑक्टोबर : News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो. या निकालानुसार, राधाकृष्ण विखेपाटील हे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश थोरात यांच्यात लढत आहे. खरंतर राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाचा महाआघाडीला धक्का बसला असं म्हणायला हकरत नाही.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश थोरात यांच्यात लढत आहे. इथे विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यातली सत्तास्पर्धा पाहायला मिळतेय.  सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलतभाऊ आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडू नये, ही भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली, असा विखे पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून सातव्यांदा निवडणूक लढवतायत. आतापर्यंत ते इथे एकदाही पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर - 02

अपक्ष - 03

मागील विधानसभेत काय होती स्थिती?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

2014 महाराष्ट्र विधानसभेची स्थिती

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading