धक्कादायक.. पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करताना शाळकरी मुलींवर अतिप्रसंग...

धक्कादायक.. पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करताना शाळकरी मुलींवर अतिप्रसंग...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करताना दोन शाळकरी मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

सोलापूर, 7 सप्टेंबर: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करताना दोन शाळकरी मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील जेलरोड भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भामट्याला अटक केली आहे. लक्ष्मण ज्ञानोबा बड्डू (वय-40) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला कोर्टाने 9 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांना मदत गोळा करण्याच्या सूचना सोलापूर शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पीडिता आणि तिची मैत्रिण पुरग्रस्तांना मदत गोळा करत होत्या. पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत जेलरोड परिसरातील एका कारखान्यामध्ये मदत मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी लक्ष्मण ज्ञानोबा बड्डू याने दोन्ही मुलींना जिन्याच्या पायऱ्यांवर नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एका मुलीने पेनाच्या टोकाने आरोपीच्या चेहऱ्यावर वार करून कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भावाने केला अल्पवयीन बहीणीवर बलात्कार

दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईत नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका अल्पवयीन मुलीवर बालात्कार केल्याच्या आरोपावरून सख्या भावासह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. सगळ्यात गंभीर म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पीडित मुलीची आई आणि वडीलसुद्धा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली आईला ताब्यात घेण्यात आले आहे. पण मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर भावाने लहान बहिणीवर बलात्कार केल्यामुळे नात्याला काळिमा फासल्याचा हा प्रकार आहे.

आईने दलालाच्या मदतीने मुलीला विकलं

हे संपूर्ण प्रकरण मानखुर्द पोलीस स्टेशन परिसरातील आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी आरोपी आईने तिच्या अल्पवयीन मुलीचा एका युवकाशी विवाह लावला. पीडित मुलीचा नवरा शरीरसंबंधासाठी तिला रोज मारहाण करायचा. रोजच्या जाचाला कंटाळून मुलगी आईकडे गेली. या सगळ्याच्या काही दिवसानंतर आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला एका दलालामार्फत विकले होते.

लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 7, 2019, 5:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading