कोयना परिसरासह कोकण किनारपट्टी भूकंपाच्या धक्क्याने हादरली

कोयना परिसरासह कोकण किनारपट्टी भूकंपाच्या धक्क्याने हादरली

कोयनासह पाटण आणि कोकण किनारपट्टी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

  • Share this:

सातारा,23 डिसेंबर:साताऱ्यातील कोयना परिसर सोमवारी सकाळी 6 वाजून 43 मिनिटांला भूकंपाच्या धक्याने हादरला. कोयनासह पाटण आणि कोकण किनारपट्टी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. सुदैवाने या भुकंपात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंप जाणवताच दिल्लीतील लोक आपल्या घराबाहेर आले. पालघर जिह्यातील डहाणू, तलासरी येथे 14 डिसेंबरला पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी आलेला भूकंप 4.8 रिश्टर स्केलचा होता.

दरम्यान, 20 डिसेंबरला दिल्‍ली-एनसीआरसह उत्तर भारतात काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्र अफगानिस्‍तानातील हिंदुकुशमध्ये होता. हरियाणा, पंजाब, काश्‍मीरमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

भूकंपाचा केंद्र हिंदूकुशमध्ये..

भूकंप विज्ञान विभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूकंपाचा केंद्र अफगानिस्‍तानातील हिंदुकुशमध्ये होता. 20 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजून 13 मिनिटांला आलेल्या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, चंडीगड, श्रीनगर, फरिदाबाद, हिमाचल प्रदेशातील चंबा आणि डलहौसी, उत्तर भारतातील नोएडा, गाझियाबाद, मथुरा आणि मेरठसह अफगाणिस्तान, उजबेकिस्तान आणि पाकिस्तानात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेकांच्या घरातील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्या. त्यामुळे लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

भूकंपाचे केंद्र काबुलपासून जवळपास 245 किमी दूर होते. त्यामुळेच भारतावर याचा जास्त परिणाम पडला नाही. पण, भूकंप जाणवताच दिल्लीतील लोक आपल्या घराबाहेर आले. जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि श्रीनगरमध्येही हे झटके जाणवले आहेत. पाकिस्तानातील लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्येही याचा परिणाम जाणवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 08:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading