…तर खासदारकीचा राजीनामा देईल, सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 09:43 PM IST

…तर खासदारकीचा राजीनामा देईल, सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

अहमदनगर,30 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचे खासदार सुजय विखे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर प्रत्युत्तर देतांना …तर खासदारकीचा राजीनामा देईल, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. खासदार सुजय विखे हे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.

एक रुपयाचा भ्रष्टाचार दाखवून द्यावा..

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. खासदार विखे यांनी सांगितले की, राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे. गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देईल. माझे अंदाज खरे ठरतात. मी केंद्रात मंत्री झालो तर आश्चर्य वाटू देऊ नका, असेही सुजय विखे यांनी यावेळी म्हटले आहे. सुजय विखेंच्या या वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यंदा मोठी स्पर्धा..

यंदा तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या उसावर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची नजर आहे. गळीत हंगामात उसाबाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्याला नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत ठरली. यंदा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला, तर ते अडचणीचे ठरू शकते. चांगला पाऊस असल्याने पुढील गळितासाठी राहुरीच्या कार्यक्षेत्रात १४ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध राहणार असल्याने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळप करून डॉ. तनपुरे कारखान्यास आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचा उतारा नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांपैकी एक ठरला आहे. कारखान्यास जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठन करून दिल्याने डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला आहे.

VIDEO:मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...