Home /News /maharashtra /

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांचे हाल, डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांचे हाल, डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

स्टाफला हलक्या दर्जाचे मास्क, हॅन्डग्लोज मिळतात असा आरोप येथिल कर्मचारी यांनी केला आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

कोल्हापूर 26 सप्टेंबर: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील कोरोनाग्रस्ताच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेले दोन महिन्याचे वेतन आणि सोयीसुविधा न मिळाल्याने आजरा कोविड सेंटर वरील कंत्राटी डॉक्टर व नर्स यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे यामुळे आजरा तालूक्यातील कोरोना रुग्णांच्या आरोग्याचं काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. या भागतले राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कारभार आहे. असं असतांनाही जिल्ह्यात असा प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना ग्रस्ताची संख्या वाढत असतानाच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना ग्रस्ताची हेळसांड होत आहे. येथील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत येथे बर्‍यापैकी डॉक्टर आणि नर्सही पॉझिटिव्ह आल्या आहेत. मात्र या स्टाफला हलक्या दर्जाचे मास्क, हॅन्डग्लोज मिळतात असा आरोप येथिल कर्मचारी यांनी केला आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. भाजप अध्यक्षांनी जाहीर केली टीम; विनोद तावडेंबरोबर पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी डॉक्टर आणि कर्मचारी आपली जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र आम्हाला साध्या साध्या गोष्टीही मिळत नाहीत. वरिष्ठांना सांगूनही फक्त आश्वासने दिली जातात असा आरोपही इथल्या डॉक्टरांनी केला आहे. देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांवर पोहोचला आहे. 'फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली...', श्रद्धा कपूरचा मोठा खुलासा गेल्या 24 तासांत 1 हजार 089 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 93,379 वर पोहोचली आहे. राज्यात 9 लाख 60 हजार 961 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत 48 लाख, 49 हजार 585 रुग्णांनी कोरोनावर मात करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या