अरे देवा...देवीच्या रोगाची लागण, अडीचशे मेंढ्या दगावल्या

अरे देवा...देवीच्या रोगाची लागण, अडीचशे मेंढ्या दगावल्या

जेऊरच्या पुर्वकडील माळरानात सर्वत्र मेंढ्याचे मृत देह पहायला मिळत असल्याने मेंढपाळ घाबरले आहेत.

  • Share this:

पुरंदर 13 जानेवारी : अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटातून सावरलेल्या मेंढपाळांना आता देवीच्या रोगाने गाठलयं. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या गावांमधून आता मेंढ्यांना देवीच्या रोगाची मोठ्याप्रमाणात लागण होऊ लागली आहे. या भागातील दोनशे ते अडीचशे मेंढा आतापर्यंत मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे येथील मेंढपाळाचे पाडे आता संकटात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेऊर मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून या रोगाने मोठ्या प्रमाणात मेंढ्या दगावत असल्याने मेंढपाळ काळजीत सापडले आहेत.

त्यांच्यावर कोणताच उपचार लागु होत नसल्याने हतबल झालेल्या मेढपाळांनी अखेर सरकारी दवाखाना गाठला.येथील डॉक्टरांनी हा देविचा रोग असल्याचे सांगीतले त्याच बरोबर यावर कोणताच उपचार नसल्याचे सांगत हात झटकले. यामुळे येथील मेढपाळ हतबल झालाय. जेऊरच्या  पुर्वकडील माळरानात सर्वत्र मेंढ्याचे मृत देह पहायला मिळत असल्याने मेंढपाळ घाबरले आहेत.याचा येथील लोकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होणार आहे.

VIDEO सोलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी नोटांची अशी झाली उधळण

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी जेऊर येथे जाऊन मेंढपालांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 13, 2020, 10:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading