'देवेंद्र फडणवीस हेच शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे खरे वारसदार'

'देवेंद्र फडणवीस हेच शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे खरे वारसदार'

2014मध्ये काहीही नसताना सहा जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्यामुळे आता 12 जागा असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, नातेपुते 9 सप्टेंबर : विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत असं मत रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज नातेपुते येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्ह्यातल्या चार जागा मागणार असल्याचं सांगून या जागांवर तयारी करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत.

भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटप मध्ये सरकार सोबत असलेल्या शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी 18 जागा देण्याचं ठरलं असल्याचं जानकर यांनी सांगितलं. रासपची शक्ती वाढल्यामुळे घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ आपण असणार असे संकेतही जानकर यांनी दिलेत.

मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका!

ते पुढे म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले माझे कायमच मोठे भाऊ राहिले आहेत तरी राज्यात रासपची वाढलेली सत्तेतील भागीदारी जिल्हा परिषद ,पंचायत समित्या, नगरपरिषद यामध्ये वाढलेल्या बळामुळे 18मधल्या दहा ते बारा जागा लढवणार आहे. 2014मध्ये काहीही नसताना सहा जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्यामुळे आता 12 जागा असणार आहे असंही त्यांनी सांगितलं. यामुळे आता घटक पक्षांमध्ये रासप मोठा भाऊ अशी चर्चा आता सुरू झालीय.

'युतीचे नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात'

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्करत भाजपसोबत युती करावी लागतेय. त्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. 'युती'चे हे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे नेते कोण आहेत याचा खुलासा लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचंच नव्हतं. यामुळे त्यांनी कधीच चर्चा केली नाही धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हे सर्व कशासाठी करत आहेत हे पुढच्या काळात आपण सांगूच असा इशाराही त्यांनी दिला.

बडनेरामध्ये रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पडणार का?

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी  जोरदार टीका केली. काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी यांच्या शंभर दिवसाच्या सरकारने देशात मंदिर बनवलं, सर्व बेरोजगारी संपवली, विकास केला असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला. सरकार फक्त प्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.

First published: September 9, 2019, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading