धुणे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

धुणे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

  • Share this:

सांगली,22 सप्टेंबर: धुणे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला आहे. साधना किरण देशमुख (वय-35) व उत्कर्षा किरण देशमुख (वय-17) अशी मृत मायलेकींची आहेत. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण देशमुख यांचे कुटुंबीय मुळचे बाणूरगड (ता.खानापूर) येथील असून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कुंडलापूरला राहायला होते. ते सुझलॉनच्या या पवनऊर्जा कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. मुलगी उत्कर्षा ही कवठेमहांकाळ येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान विजयादशमी (दसऱ्या) सण तोंडावर आला असल्याने पत्नी साधना देशमुख व त्यांची मुलगी उत्कर्षा या दोघी रविवारी सकाळी सणाचे धुणे धुण्यासाठी गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डोंगरसोनी रस्त्यालगतच्या त्यांच्याच शेततळ्यावर गेल्या होत्या. कपडे व धुणे धुत असताना उत्कर्षा ही पाय घसरून पाण्यात पडली. पाण्यात पडलेल्या मुलीची आर्त किंकाळी ऐकून तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघींना ही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पाण्यात बुडून दोघींचाही मृत्यू झाला होता. कुंडलापूर येथील धनाजी पाटील, संभाजी पाटील, दिनकर पाटील, बाळा पाटील, वैभव लिगाडे यांच्यासह युवकांनी शेततळ्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

Published by: Sandip Parolekar
First published: September 22, 2019, 7:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या