Home /News /maharashtra /

शरद पवारांवर बोलण्याची लायकी नाही, गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले!

शरद पवारांवर बोलण्याची लायकी नाही, गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले!

Mumbai: Nationalist Congress President (NCP) Sharad Pawar with party leader Ajit Pawar (L) during a meeting at NCP office, in Mumbai, Sunday, Nov. 3, 2019. (PTI Photo) (PTI11_3_2019_000241B)

Mumbai: Nationalist Congress President (NCP) Sharad Pawar with party leader Ajit Pawar (L) during a meeting at NCP office, in Mumbai, Sunday, Nov. 3, 2019. (PTI Photo) (PTI11_3_2019_000241B)

'शरद पवार यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो ज्या माणसाची योग्यता नाही त्याने काय बोलावे. सूर्याकडे पाहून थुंकण्याचा हा प्रकार आहे.'

किरण मोहिते,  सातारा 27 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Shard Pawar) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर (BJP Mlc Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) संतापले आहेत. त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. ज्या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं त्याच्याविषयी काय बोलायचं. हा सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, शरद पवार यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो ज्या माणसाची योग्यता नाही त्याने काय बोलावे. सूर्याकडे पाहून थुंकण्याचा हा प्रकार आहे. मोठा नेता असता तर गोष्ट वेगळी. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. म्हणजे तुम्ही ओळखू शकता. त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देऊ नये. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उत्तरं देतांना तोंडाला फेस आला. एखाद्याला नको तेवढे मोठ केल की असं होतं. संकट आले की शरद पवारांना बसवत नाही. आजही ते साताऱ्यात आले, पवार साहेबानी भर पावसात सभा घेतली. मोदींनंतर पवार साहेबांच्याकडे पाहिले जाते. राजकीय कारकिर्दीत पवार साहेब कधी घसरले नाहीत. पवार साहेब सारखं काम करत असतात. यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत त्यांचं नाव घेतलं जातं. 10 वर्षात किती बदलला तळपता सूर्य, नासाने शेअर केला VIDEO पडळकरांसारख्या पात्रता नसलेल्या लोकांना डोक्यावर घेतल की असं होत. लोकच त्यांना जागा दाखवतील. प्रत्येकाने लायकी पाहून बोलावे. शब्द जपून वापरावे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे भेटले त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. ते प्रश्न ऐकून घेतले. पुणे जिल्ह्यापेक्षा साताऱ्याने प्रेम दिलं आहे. कोणी काय करायचा त्यांचा प्रश्न आहे. कोरोनाचा दुसरा टप्पा कसा असेल? लाखोंनी जाईल लोकांचे प्राण - WHO दरम्यान, पुण्यात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांकडून शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांच्या टीकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी पडळकरांना थेट उत्तर देण्याचं टाळलं. 'मला बोलायचं आहे...पण आता नाही...लवकरच सविस्तर बोलेन,' असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर लगेचच प्रतिहल्ला करण्याचं टाळलं. संपादन - अजय कौटिकवार    
First published:

Tags: Ajit pawar, Coronavirus, Sharad pawar

पुढील बातम्या