कराडमध्ये गोळीबार.. नामचिन गुंडावर अज्ञात हल्लखोरांनी झाडल्या 11 गोळ्या

कराडमध्ये नामचिन गुंड पवन सोलवंडे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 11 गोळ्या झाडल्या. 9 गोळ्या छातीत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:57 PM IST

कराडमध्ये गोळीबार.. नामचिन गुंडावर अज्ञात हल्लखोरांनी झाडल्या 11 गोळ्या

किरण मोहिते,(प्रतिनिधी)

सातारा, 21 ऑगस्ट- कराडमध्ये नामचिन गुंड पवन सोलवंडे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 11 गोळ्या झाडल्या. 9 गोळ्या छातीत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (20 ऑगस्ट) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात घडली. या घटनेनंतर कराड शहर व परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पवन सोलवंडे याच्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 11 गोळ्या झाडल्या. हल्लेखोर स्थानिकच असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास चक्रे गतिमान करण्यात आले आहेत. तीन वेगवेगळी तपास पथके तयार करून संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

बांधकाम व्यावसायिकाला मागितली होती खंडणी...

पवन सोळवंडेवर कराड पोलीस स्टेशन अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच पवनवर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास मंगळवार पेठेतील बांधकाम व्यावसायिक निहाल अल्ताफ पठाण यांनी पवन याने खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने त्याच्या घराच्या परिसरात पवन सोलवंडेसह अन्य चौघांनी नंग्या तलवारीची दहशत माजवल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading...

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 10:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...