मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापुरकरांचा नादच खुळा! क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील साळगाव या छोट्याशा गावात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील साळगाव या छोट्याशा गावात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील साळगाव या छोट्याशा गावात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे.

कोल्हापूर, 30 डिसेंबर: कोल्हापुरकरांचा नादच खुळा, कोल्हापुरांचा (Kolhapur) नाद करायचा नाही, असं तुम्ही या आधीही ऐकलं असेल. पण आता ही बातम्ही वाचून तुम्हाला त्याची प्रचिती येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) एका शहरात क्रिकेट स्पर्धेचं (Cricket tournament) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची बक्षीस ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

विजेत्या संघाला चक्क एक बोकड आणि चषक बक्षीस दिला जाणार आहे तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला चक्क आठ गावठी कोंबडे आणि चषक तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला सहा गावठी कोंबडे आणि चषक दिला जाणार आहे.

हही वाचा...महाराष्ट्र हादरला! पेणमध्ये अडीच वर्षांच्या कोवळ्या जीवावर बलात्कार करुन हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील साळगाव या छोट्याशा गावात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेट प्रेमी साळगाव यांच्या वतीनं या हाफ पीच क्रिकेट स्पर्धा असणार आहे. गेल्या सोमवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून आतापर्यंत 40 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. पण आतापर्यंत तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील, ऐकल्या असतील त्या स्पर्धांची बक्षीसही रोख रक्कम व चषक अशा स्वरूपात असते पण ही स्पर्धा मात्र वेगळी ठरली आहे.

क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या क्रिकेट संघाला चक्क बोकड बक्षीस म्हणून दिला जाणार आहे तर द्वितीय विजेत्या संघाला चक्क एक बोकड आणि चषक बक्षीस दिला जाणार आहे तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला चक्क आठ गावठी कोंबडे आणि चषक तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला सहा गावठी कोंबडे आणि चषक दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी 501 रुपये प्रवेश फी असली तरी आजरा परिसरातील अनेक क्रिकेट संघांनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली आहे. सध्या ही स्पर्धा सुरू असून येत्या दोन दिवसांत क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामने होणार आहेत.

हेही वाचा..एकनाथ खडसे यांचं ED ला विनंती पत्र, चौकशीसाठी मागितली 14 दिवसांची मुभा

दरम्यान, ग्रामीण भागातही क्रिकेटच प्रचंड वेड आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळेजण कंटाळले होते. या काळात अनेक स्पर्धाही भरवण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण या क्रिकेट स्पर्धेत ही बक्षीस जगात भारी असल्यामुळे आता क्रिकेट स्पर्धा पाहायला येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाबतचे जरी सगळे नियम पाळत ही क्रिकेट स्पर्धा साळगाव या गावाजवळ होत असली तरी चक्क बोकड आणि कोंबडे बक्षीस असल्याने क्रिकेटप्रेमी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आपल्या बक्षिसांवर चांगलाच ताव मारणार आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Kolhapur, Maharashtra, Test cricket, कोल्हापूर, क्रिकेट