कोरोना टेस्टसाठी तो हॉस्पिटलच्या आवारात झोपला आणि पुन्हा उठलाच नाही, कोल्हापूरात युवकाचा मृत्यू

कोरोना टेस्टसाठी तो हॉस्पिटलच्या आवारात झोपला आणि पुन्हा उठलाच नाही, कोल्हापूरात युवकाचा मृत्यू

मृत्यूनंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर 18 मे: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आज दुसरा बळी गेला. मुंबई विलेपार्ले इथं राहणारा हा युवक कोल्हापूरमध्ये परतला होता.  रविवारी स्वॅब टेस्ट देण्यासाठी तो हॉस्पिटलच्या  रांगेच उभा होता मात्र वेळ झाल्यानं हॉस्पिटल आवारातच झोपला. तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूनंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसऱ्या बळीमुळे भीतीच वातवरण निर्माण झालं आहे.

मे अखेरपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली असली तरीही कोरोना विषाणूची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. गेल्या 24 तासामध्ये तब्बल 157 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 96169 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 3029 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 5242 नवीन प्रकरणं समोर आली आहेत.

सध्या देशात 56 हजार 316 सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. इथल्या रूग्णांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही 1198 वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 379 पर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 659 आहे.

महिला SPचीं कमाल, रात्री 12 वाजता भुकेल्या मजुरांना स्वयंपाक करून दिलं जेवण

महाराष्ट्रात अजून काही दिवस तर निर्बंध असतील, असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड झोनमधले निर्बंध फार शिथिल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्याबरोबरच Coronavirus ची ही लढाई निर्णायक असेल याची आठवण करून दिली आणि हे संकट संपवण्याची डेडलाईनही जाहीर केली. उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या मार्फत जनतेशी संवाद साधला.

'कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ', असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी अजून काही काळ लॉकडाऊन राहील, हे स्पष्ट केलं. पुढचे काही महिने सावध राहायलाच हवं. पण हे संकट लवकरात लवकर संपवायचं आहे आणि ते आपण संपवणार, असा विश्वास व्यक्त केला.

वीजेच्या तारेवर अडकलेल्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात आईला यश येईल? पाहा VIDEO

हे संकट कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कारण पावसाळ्याबरोबर नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतं. अॅडमिशन, प्रवेश परीक्षा यांची लगबग असते आणि कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले. शाळा कशा सुरू करायच्या, परीक्षा, अॅडमिशन्स कशा घ्यायच्या यावर विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

First published: May 18, 2020, 10:32 PM IST

ताज्या बातम्या