VIDEO : कोल्हापुरात हजारो मजूर रस्त्यावर, मूळ गावी जाण्याची मागणी

VIDEO : कोल्हापुरात हजारो मजूर रस्त्यावर, मूळ गावी जाण्याची मागणी

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं काम लॉकडाऊमुळे बंद आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही. 15 दिवसांपासून खाण्यासाठी काही मिळालं नसल्याचा दावा या मजुरांनी केला.

  • Share this:

कोल्हापूर, 14 मे: देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तर काही छोट्या उद्योगांना कायमचं टाळं लागायची वेळ आली आहे. अनेक मजुरांचं कामंही बंद झाल्यानं एक वेळचं खाण्यासाठी पैसे नाहीत अशी भ्रांत निर्माण झाल्यानं कामगार मिळेल त्या मार्गानं आपल्या गावी परतत आहेत. अनेक मजुरांची अजूनही आपल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. कोल्हापुरातील अनेक मजूर बांधवांचा अखेर संयम सुटला आणि गुरुवारी मजुरांनी महामार्ग रोखला.

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचं काम लॉकडाऊमुळे बंद आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही. 15 दिवसांपासून खाण्यासाठी काही मिळालं नसल्याचा दावा या मजुरांनी केला. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी या सर्व मजुरांनी केली आहे.

मजूर महामार्गावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तिथे मजूर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी या मागणीवर मजूर ठाम आहेत. पोलिसांनी मात्र या सर्व मजुरांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानं महामार्गावर मजुरांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. कोल्हापूर महामार्गावर पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 14, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading