Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण

  सांगली, 25 मार्च : देशभरात कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातलं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. सांगली इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आज पुण्यात दोन जण कोरोनाच्या आजारातून बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आला. हे वाचा - Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच? हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य सगळ्याच राज्यामध्ये जनता कर्फ्यूनंतर कलम 144 लागू करण्यात आला. 5 पेक्षा अधिक लोक एकावेळी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आता कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही. प्रत्येकाने जिथे आहे तिथेच सुरक्षित राहणं बंधनकारक असल्याची घोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी याचा धोका अधिक असल्याने सरकारने काल लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच देशभरातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. हे वाचा - Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच? हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य कोरोनाचं संकट हे महाराष्ट्रावर अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लोकांनी सहकार्य करण्याची अधिक गरज आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकांना विनंती केली होती की, 'गरज असेल तरच बाहेर पडा.'

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona, Coronavirus symptoms

  पुढील बातम्या