मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? सातारा SP नी शेअर केला भावुक करणारा VIDEO

IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? सातारा SP नी शेअर केला भावुक करणारा VIDEO

साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी पती सध्या घरी काय करतोय अशी पोस्ट लिहिताना पतीच्या दिवसभराच्या शेड्युलचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी पती सध्या घरी काय करतोय अशी पोस्ट लिहिताना पतीच्या दिवसभराच्या शेड्युलचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी पती सध्या घरी काय करतोय अशी पोस्ट लिहिताना पतीच्या दिवसभराच्या शेड्युलचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

सातारा, 16 एप्रिल : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अनेक लोक घरातच अडकून पडले आहेत. घरातच असल्याने लोक अनेक नव्या गोष्टी शिकत आहेत. विशेषत: घरात असणारी पुरुष मंडळी स्वयंपाक करायला शिकत असलेले आणि घरकामात मदत करतानाही दिसत आहेत. आता अशीच आपल्या पतीबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी पती सध्या घरी काय करतोय अशी पोस्ट लिहिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी आणि सफाई कामगार दिवस रात्र काम करत आहेत. साताऱ्याच्या एसपी यासुद्धा आता लॉकडाऊनचं उल्लंघन होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत घरामध्ये त्यांचे पती सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्याबद्दल त्या म्हणतात की मी सध्या आणि एरवीसुद्धा काय करते हे सर्वांना माहिती आहे पण माझा नवरा सध्या घरी काय करतो असा प्रश्न मित्रांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी यामधून दिलं आहे.

एसपी तेजस्वी सातपुते यांना 24 तास काम कराव लागत असताना त्यांचे पती किशोर रक्ताटे हे घर सांभाळत आहेत. अगदी स्वयंपाकापासून ते एसपींचे ड्रेस इस्त्री करण्यापर्यंतची कामं ते करत आहेत. ही सर्व कामे करणारे कर्मचारी कोरोनामुळे येत नाहीत आणि काम करू शकत नाहीत त्यामुळे किशोर रक्ताटे सर्वकाही करत आहेत. याबद्दल पतीचा फार अभिमान आणि आदर वाटतोय म्हणून शेअर करावंसं वाटलं असंही तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं आहे.

एसपी तेजस्वी सातपुते यांची पोस्ट

याआधी एका महिला पोलीसाच्या पतीने महिनाभर ड्युटीवर असलेल्या पत्नीबद्दल भावनिक पोस्ट केली होती. त्यात म्हटलं होतं की, ती महिनाभर बाळाला भेटू शकली नाही. जेव्हा भेटलो तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी दिसलं. त्याबद्दल विचारलं असता तिनं पाय दुखतोय असं कारण सांगितलं पण खरंतर तिच्या डोळ्यात पाणी बाळाच्या आठवणीमुळं आलं होतं. पोलिस पत्नीच्या भावना, तिच्या मनाची घालमेल पतीने शब्दातून व्यक्त केली होती. असे अनेक पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि देशसेवेचं कर्तव्य  एकाचवेळी पार पाडत आहेत.

हे वाचा : रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या गरीबांसाठी मास्क बनवतयं RPF जवानाचं कुटुंब

संपादन - सूरज यादव

First published:

Tags: Coronavirus