• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Coronavirus: आशालता यांच्यानंतर आता अलका कुबल यांच्या प्रकृतीविषयी शंका; मालिकेच्या शूटिंगसाठी जमलं होतं 100 जणांचं युनिट

Coronavirus: आशालता यांच्यानंतर आता अलका कुबल यांच्या प्रकृतीविषयी शंका; मालिकेच्या शूटिंगसाठी जमलं होतं 100 जणांचं युनिट

मालिकेच्या शूटिंगसाठी 100 जणांचं युनिट कार्यरत होतं. त्यातल्या 27 जणांना Covid-19 चा संसर्ग झाला आहे. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
सातारा, 21 सप्टेंबर: एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान अनेक कलाकारांना Coronavirus चा संसर्ग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. त्यादरम्यान येथील तब्बल 27 जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांनासुद्धा Covid-19 चं निदान झालं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. आता याच मालिकेत प्रमुख भूमिका करणाऱ्या अलका कुबल यांनाही Coronavirus चा संसर्ग झाला आहे का याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेव इथे आई माझी काळूबाई नावाच्या टीव्ही मालिकेचं शूटिंग सुरू आहे. 100 जणांपेक्षा अधिक माणसांचं युनिट या शूटिंगसाठी एकत्र जमलेलं आहे. त्यातल्या 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना साताऱ्यातल्या प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकरांची भूमिका आहे. त्यासाठी त्याही मांढरदेवजवळ युनिटबरोबर दाखल झाल्या होत्या. शूटिंगदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. सध्या आशालता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मालिकेमध्ये मुख्य काळूबाईची भूमिका बजावणाऱ्या अलका कुबल या देखील या चित्रिकरणात मध्ये सहभागी होत्या. त्यामुळे आता अलका कुबल यांनाही संशयित रुग्ण म्हणून आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कुबल यांना कोविडचा संसर्ग झाला आहे की नाही, याबद्दल अद्याप वृत्त समोल आलेलं नाही.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published: