Home /News /maharashtra /

कोपरगाव: कोरोना चाचणीचा रिपोर्ट येताच रुग्णाने केली आत्महत्या, नदीपात्रात घेतली उडी

कोपरगाव: कोरोना चाचणीचा रिपोर्ट येताच रुग्णाने केली आत्महत्या, नदीपात्रात घेतली उडी

कोरोनाची साथ सुरू होऊन आता 8 महिने होत आहेत. मात्र लोकांच्या मनात असलेले गैरसमज अजुनही निघालेले नाहीत. कोरोनाची भीती मनात बसण्याने अनेक रुग्णांनी आपलं जीवन संपविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

कोपरगाव 01 ऑक्टोबर: कोरोनाची साथ सुरू होऊन आता 8 महिने होत आहेत. मात्र लोकांच्या मनात असलेले गैरसमज अजुनही निघालेले नाहीत. कोरोनाची भीती मनात बसण्याने अनेक रुग्णांनी आपलं जीवन संपविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता आणखी एका कोरोना रुग्णाने नदी पात्रात उडी घेऊन आपलं आत्महत्या केल्याची घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची ही घटना आहे. कोरोना झाल्याच्या धास्तीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. कान्हेगाव येथील 47 वर्षीय वाल्मिक वाळूंज यांचा कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आल्यानंतर भीतीने त्यांनी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करताहेत. कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील वाल्मिक वाळूंज यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. कोरोना झाल्याच्या धास्तीने त्यांनी कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर पुलावरून बुधवारी दुपारी  स्वतःला गोदावरी नदीपात्रात झोकून दिले. सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी आणी आपली जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती आहे. त्यांचा मृतदेह कोकमठाण शिवारातील हेमाडपंथी महादेव मंदिराजवळ आढळून आला. दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये 41/20 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे करीत आहे. दरम्यान, एका अभ्याासनुसार कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे. याबाबत संशोधन करण्यात आलं. कोरोनाव्हायरसमुळे पुरुषांच्या टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी होते आणि हेच त्यांच्या मृत्यूचं कारण आहे. द प्रिंटने याबाबत वृत्त दिलं आहे. 'या' वयोगटातील रुग्णांसाठी आली कोरोना लस, वाढतेय प्रतिकारशक्ती तुर्कीतील मर्सिन विद्यापीठ आणि मर्सिन सिटी एज्युकेशन अँड रिसर्च हॉस्पिटलच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. द एजिंग मेल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमधील सेक्स हार्मोन आहे. वयाच्या चाळीशीनंतर हा हार्मोन सरासरी 0.8-2 टक्क्यांनी कमी होतो. याचा परिणाम कोरोना रुग्णांवरही दिसून येतो आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या