मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाची दहशत: इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोनाची दहशत: इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

 राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी आणखी चार रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी आणखी चार रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी आणखी चार रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

उस्मानाबाद,16 मार्च: राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी आणखी चार रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता एकूण कोरोणा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी राजेश टोपे दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता राज्यात शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हेही वाचा...खूशखबर! केरळपाठोपाठ राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, 'कोरोना'वरील उपचाराचं जयपूर मॉडेल दुसरीकडे, कोरोना व्हायरसच्या भीतीपासून देवी-देवताही सुटलेले नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथिल तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद होण्याची इतिहासात पहिलीच घटना आहे. हेही वाचा...आता संसारात शिरला कोरोना! व्हायरसमुळे 300हून अधिक जोडप्यांनी केला घटस्फोटासाठी अर्ज तुळजापूरचे भवानी देवीची महती मोठी असल्याने राज्यासह लगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात गर्दीमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका मोठा आहे. यामुळेच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या काळात देवीचे अभिषेक व पूजा हे पुजारी करतील तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते गर्दी टाळण्यासाठी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. सदरिल भवानी मातेचे मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार असून धार्मिक विधी मात्र रोज पार पाडल्या जाणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच मंदिर बंद होत असल्याने तुळजाभवानीच्या भाविकासाठी ही थोडीशी निराशाजनक बातमी जरी असली तरी कोरोनोवर उपाय करण्यासाठी मंदिर समितीने जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच म्हणावं लागेल.
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Maharashtra news

पुढील बातम्या