हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडाकडून तरुणाची हत्या, कुऱ्हाडीने केला वार

हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडाकडून तरुणाची हत्या, कुऱ्हाडीने केला वार

हप्ता वसुलीचे कीड आता ग्रामीण भागातही पसरले

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,4 डिसेंबर: हप्ता वसुलीचे कीड आता ग्रामीण भागातही पसरले आहे. या हप्तावसुलीतूनच बांधकाम करणाऱ्या एका तरुण मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तालुक्यातील रांजणी येथे ही घटना घडली आहे. साहिल पठाण असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडानी साहिलच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची हत्या केली. साहिल पठाण ही खोसपुरी येथील रहिवासी आहे.

मिळालेली माहिती अशी की, मुबारक पठाण यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ घोडके यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. या कामावर दहा दिवसांपासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण हे मजुरीने बांधकाम करत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली असता दुपारी 1 वाजता वाळू चालत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपी आले. त्यांनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात, असे सांगितले. त्यामुळे घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले. तरीही त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेले. आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कुऱ्हाडीने वार केला. यात साहिल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पाथर्डी आणि नंतर नगर येथे खासगी रुग्णालयात हलवले. परंतु गंभीर दुखापत गंभीर असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या