लवकरच महाशिवाआघाडी अस्तित्वात येईल, प्रणिती शिंदे यांचं मोठं वक्तव्य

लवकरच महाशिवाआघाडी अस्तित्वात येईल, प्रणिती शिंदे यांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम आणखी वाढला आहे.

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर, 19 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आत्ताच अनुमान लावणे चुकीचे आहे. मात्र, लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात आलेली पाहायला मिळेल, असं मोठं वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम आणखी वाढला आहे. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबतही किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झालेला नाही,' असे म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली होती.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचे होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपापसात चर्चा झाली आहे. कुठलाही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असे शरद पवार म्हणाले.

राजू शेट्टी यांनी दिला हा सल्ला...

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीत सामील असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजालात फसू नये. सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही,' असे ट्वीट राजू शेट्टी यांनी केले आहे. त्यामुळे राजू शेट्टींना राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची भीती आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published: November 19, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading