ABVP च्या कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे, 'त्या' घटनेचे पडसाद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 04:01 PM IST

ABVP च्या कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे, 'त्या' घटनेचे पडसाद

सागर सुरवसे, (प्रतिनिधी)

सोलापूर, 23 ऑगस्ट- काँग्रेस संलग्न नॅशनल स्टुडण्ट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धपुतळ्याची स्थापना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केली होती. या पुतळ्याला काळे फासून एनएसयूआयच्या सदस्यांनी पादत्राणांचा हारही घातला. या घटनेचे शुक्रवारी सोलापूर शहरात पडसाद उमटले. ABVP च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. हिंदुत्ववादी, सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांकडून सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर या घटनेचा निषेध केला.

कृत्य निश्चित चुकीचं...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य निश्चित चुकीचे आहे. ही काँग्रेसची संस्कृती नाही. पण सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्याबरोबर सावरकरांचा पुतळा लावणे चुकीचे आहे. त्या दोघांच्या विचारात खूप फरक होता. ABVP नेच हा पुतळा बसवला होता. गेल्या पाच वर्षांत सरकार फक्त चौकशीचा फार्स करत आहे. गुन्हे दाखल करा, कारवाई करा पण हे करताना विरोधक, सत्ताधारी असा फरक करु नका. मुंबई बँकेच्या घोटाळ्यावर का कारवाई होत नाही.भाजपमध्ये कोणी आले की त्यांना सर्व माफ का, असा सवालही सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

Loading...

एनएसयूआयच्या 20 विद्यार्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळे फासले व पादत्राणांचा हारही घातला, अशी माहिती संघटनेने दिली. यावेळी या विद्यार्थ्यांनी 'भगत सिंग, बोस अमर रहें' अशा घोषणाही दिल्या. यासंदर्भात एनएसयूआयच्या दिल्ली विभागाचा अध्यक्ष अक्षय तक्रा म्हणाला, 'एका रात्रीत सावरकरांचा पुतळा भगत सिंग व बोस यांच्याशेजारी ते कसे काय उभारू शकतात? यामुळे हे सर्व प्रकरण आम्हाला आमच्या हातात घ्यावे लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एनएसयूआयच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने एनएसयूआयच्या या कृत्याविरोधात संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही अभाविपने केली आहे.

VIDEO: 'चला फोडुया EVM ची हंडी'; EVMविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...