सांगलीत राजकीय भूकंप; काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचा मुलगाही जाणार भाजपमध्ये!

सांगलीत राजकीय भूकंप; काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचा मुलगाही जाणार भाजपमध्ये!

'शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबावर अन्याय केला, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले.'

  • Share this:

असिफ मुरसल, सांगली 15 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे माजी सभापती, दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र  सत्यजित देशमुख यांनी  काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केलीय. सोमवारी महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये देशमुख प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय. सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षच्या सर्व पदाचा राजीनामा देणार असल्याची देखील घोषणा केलीय. आघाडीत शिराळा काँग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित देशमुख दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते.

शरद पवारानंतर भाजप रोहित पवारांनाही धक्का देणार!

सत्यजित देशमुख यांनी  आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा शिराळा येथे आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्यजित देशमुख यांनी हा आपला निर्णय जाहीर केला. सोमवारी 16 सप्टेंबरला भाजपची महाजनादेश यात्रा सांगली जिल्ह्यात येत असून यावेळी देशमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षची शकलं उडायली लागली आहेत असं ते म्हणाले.

भाजपच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमामधून गणेश नाईकांचा काढता पाय

शरद पवार यांनी  शिवाजीराव देशमुख साहेबावर अन्याय केला, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले अशा शब्दात राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर आगपाखड करत सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. काँग्रेसशी आतापर्यत एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख घराण्याने  भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. यामुळे सांगलीत मोठा राजकीय भूकंप झाला असून यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 15, 2019, 8:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading