साताऱ्यात 'सामना' रंगणार.. पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडने दिला हा आदेश

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 07:19 PM IST

साताऱ्यात 'सामना' रंगणार.. पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडने दिला हा आदेश

किरण मोहिते,(प्रतिनिधी)

सातारा,30 सप्टेंबर: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण असाच सामना साताऱ्यात रंगणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, काल घटस्थापनेच्या मुहुर्तावर कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव दिले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांनी रिंगणात उतरवले आहे.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी अचानक पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले. पण ही निवडणूक लढवण्यास पृथ्वीराज चव्हाण फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. मात्र, आता त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आधीपासून चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला आपला निर्णय कळवला होता. त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या नेत्यांची नावे होती चर्चेत..

Loading...

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत होती. यामध्ये माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील नाव आघाडीवर होते. तसेच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत होती.

उदयनराजेंना पराभवाची भीती?

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

VIDEO:अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...