काँग्रेसला बसणार मोठा हादरा, हर्षवर्धन पाटील भाजपच्या मार्गावर!

1995 मध्ये युतीचं सरकार असताना अपक्ष आमदार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 08:57 PM IST

काँग्रेसला बसणार मोठा हादरा, हर्षवर्धन पाटील भाजपच्या मार्गावर!

मधुकर गलांडे, इंदापूर 3 सप्टेंबर : काँग्रेसचे नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या मार्गावर आहेत. पाटील यांनी बुधवारी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा बोलावलाय. या मेळाव्यात ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते त्यांचं म्हणणं जाणून घेऊन आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. पाटील यांनी निर्णय जाहीर केला तर तो काँग्रेससाठी मोठा हादरा असेल असं बोललं जातंय. 1995 मध्ये युतीचं सरकार असताना अपक्ष आमदार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीने सहकार्य केलं नसल्यामुळेच आपला पराभव झाल्याची खंत त्यांना अजुनही आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांच नाराजी दूर झाली नाही. सध्याचं राज्यातलं वातावरण हे भाजपला अनुकूल आहे. भाजप-शिवसेनेचीच सत्ता पुन्हा येण्याची शक्यता असल्याने पाटील हे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करू शकतात.

शिवसेनेत येण्यासाठी शिवसैनिकांचं छगन भुजबळांना साकडं!

सहकार क्षेत्रात पाटील यांचा मोठा दबदबा आहे. तीन साखर कारखाने आणि अनेक सहकारी संस्था त्यांच्याकडे असून त्या सुरळीत चालवायच्या असतील तर सरकारची मदत आवश्यक असते. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसमध्ये राहून काय फायदा असा ते विचार करू शकतात. काही दिवसांपूर्वी आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभाला त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं.

विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

Loading...

त्यासाठी निमंत्रण देण्यासाठी ते सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा थेट सत्तेत जाणं किंवा सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षांमधले नेते घेत असून काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संध्या रिघ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...