महापालिकेत अलिबाबा चाळीस चोरींची टोळी, न केलेल्या कामांचे असे छापले दीड कोटी

महापालिकेत अलिबाबा चाळीस चोरींची टोळी, न केलेल्या कामांचे असे छापले दीड कोटी

महापालिकेची दीड कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या गटनेत्यांनी केला होता. त्या संबंधित नगरसेवकाचे नाव महापालिका प्रशासनाने जाहीर करावे अशी मागणीही यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली होती.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 21 जानेवारी : सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून महापालिकेची दीड कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या गटनेत्यांनी केला होता. त्या संबंधित नगरसेवकाचे नाव महापालिका प्रशासनाने जाहीर करावे अशी मागणीही यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला भाजप नगरसेवक विनायक विटकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आरोप करणाऱ्या 'अलिबाबा चाळीस चोर'च्या टोळीने कथीत भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत. विनाकारण आरोप करू नयेत, असं आव्हानही नगरसेवक विटकर यांनी दिले. महापालिकेची शनिवारी झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. या सभेत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रभाग 4मधील कामासंदर्भात गंभीर आरोप केले होते.

कोणाचंही नाव न घेता एका नगरसेवकाने आणि त्यांच्या टोळीने प्रभाग क्र. 4 मधील कामांची बिले सादर करताना मनपा अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करुन बिले तयार केली. यातून दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. या नगरसेवकाचे नाव प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली होती.

इतर बातम्या - शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो, सोशल मीडियावर चर्चा

या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक विनायक विटकर म्हणाले, शनिवारच्या सभेत झालेले आरोप चुकीचे आहेत. महापालिकेत अलिबाबा आणि चाळीस चोर यांची टोळी आहे. टोळी प्रमुखांपैकी एक जण मुरारजी पेठेत, दुसरा भवानी पेठेत, तिसरा जुनी मिल चाळ तर चौथा बुधवार पेठ भागात राहतो. मी त्यांची नावे घेणार नाही. समस्त सोलापूरकरांना त्यांची नावे माहित आहेत. मुरारजी पेठ आणि भवानी पेठेतील नगरसेवकाचे कारनामे उघड आहेत. एक जण आमच्या पक्षाचा असला तरी आम्ही बोलायला घाबरणार नाही.

जुनी मिल चाळ परिसरात राहणाऱ्या नगरसेवकाने महापालिका शाळा एकजवळ बेकायदेशीर गाळे बांधले. त्याचे भाडे तेच घेतात. नवी पेठेत स्वच्छतागृह पाडून इमारत बांधली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. यांनीच महापालिकेच्या अनेक जागा हडप केल्या. बुधवार पेठेत राहणाऱ्याने तर रस्त्यावरच घर बांधले आहे. मनपा अधिकाऱ्यांवर दबाव आणून परवाने घेतले.

इतर बातम्या - UPSC च्या प्रवेश परीक्षेतील अपयशाने विद्यार्थ्याने घेतील मेट्रोसमोर उडी, आणि...

आजही अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर कामे करून घेतली जातात. गेली 25 वर्षे ही टोळी महापालिकेत काम करीत आहे. या टोळीने इतरांवर आरोप करताना पुरावे द्यायला हवे होते. उगाच हवेत गोळीबार करीत राहिले. शनिवारी मी सभागृहात असतो तर तिथेच प्रत्युत्तर दिले असते असेही नगरसेवक विनायक विटकर यांनी स्पष्ट केले. असे असले तरी ही आलीबाबा टोळी नेमकी कोणाची आहे? तिचा टोळी प्रमुख कोण याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नगरसेवक विटकर यांनी दिली नाही.

यासोबतच केवळ प्रभाव 4मधील नव्हे तर विभागीय कार्यालय क्रमांक 1मध्ये झालेल्या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे. प्रभाग 4मध्ये भ्रष्टाचार आढळल्यास दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीही नगरसेवक विटकर यांनी यावेळी केली.

First published: January 21, 2020, 10:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या