'मेकअपबॉक्स' भोवला, प्रणिती शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याने उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती अडचणीत आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 09:26 PM IST

'मेकअपबॉक्स' भोवला, प्रणिती शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सागर सुरवसे, सोलापूर 23 सप्टेंबर : काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार यांच्या अडचणीत वाढ झालीय. शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रणिती शिंदे यांनी मेकअपबॉक्सचं वाटप केल्याने वाद निर्माण झाला होता. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना मेकअप बॉक्स गिफ्ट म्हणून वाटले असल्याची माहिती  देण्यात आली होती . त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार नरसय्या यांच्याकडून करण्यात आली आहे. आडम मास्तरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली होती.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणात नाही - पवार

निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आलं होतं.  दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत.

'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

Loading...

या दरम्यान, निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...