काँग्रेस काय करणार 'महापर्दाफाश'? जनतेनेच पोल खोलली; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

काँग्रेस काय करणार 'महापर्दाफाश'? जनतेनेच पोल खोलली; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

'राज्य आणि देशातील जनता आता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी पुढील किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही.'

  • Share this:

अहमदनगर 26 ऑगस्ट : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे दोन दिवस स्थगित करावी लागलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरुवात झाली. पाथर्डी तालुक्यात यात्रेच्या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला अभिवादन केले. पाथर्डी इथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या यात्रांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या चुकीच्या कामामुळे जनतेने त्रस्त होऊन तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही काय करणार महापर्दाफाश, जनतेनेच तुमची पोल खोलली असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केला.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य आणि देशातील जनता आता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी पुढील किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही असे फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले.

'हर बार पंजाबी क्यों, इस बार मराठी में होगा!' Dream Girl चं प्रमोशन साँग मराठीत!

काँग्रेसने केले होते हे आरोप

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेनंतर काँग्रेसची आजपासून महापर्दाफाश यात्रा सुरू झाली. अमरावती इथं झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महापूराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं असून ज्या दिवशीत सांगली पाण्यात बुडत होती, ज्या दिवशी ब्रम्हणाळ्यात होडी बुडाली त्या दिवशी हे सरकार मौज मजा करत होतं असा गंभीर आरोप त्यांनी केला. हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजुनही विमा  मिळाला नाही असा आरोही त्यांनी केला.

इंग्लंडच्या विजयाचं धक्कादायक कारण, चॉकलेट-चिकनमुळे झाला ऑस्ट्रेलियाचा पराभव?

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, हे सरकार केवळ चार भांडवल दारांचं सरकार आहे 2005-06 साली काँग्रेस सरकारने नियोजन केलं म्हणून पूर परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर नियोजनाचे बारा वाजले अशी टीकाही त्यांनी केली. सगळे वाहन उद्योग मंदावले आहेत. मंदीचा विळखा वाढतोय. वस्त्रोद्योग डबघाईला गेला, मात्र सरकार काहीच करत नाही अशी टीकाही त्यांनी केला.

माजी खासदार नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,

VIDEO: मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी धनंजय मुंडेंचं वैद्यनाथाला साकडं

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading