'मावळ प्रमाणेच रोहित पवारांचंही पार्सल जनता परत पाठवणार'

'मावळ प्रमाणेच रोहित पवारांचंही पार्सल जनता परत पाठवणार'

'मावळच्या जनतेने ज्या प्रमाणे हिंमत दाखवत पार्थचे पार्सल परत पाठवले तशीच हिंमत कर्जत-जामखेडमधील जनता दाखवून देईल.'

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर 11 ऑक्टोबर : भाजपचे मंत्री आणि दिग्गज नेते राम शिंदे हे  कर्जत-जामखेड मतदारसंघातून  तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांच्या प्रचारासाठी  मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सभा घेऊन हल्लाबोल केला. मावळ लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवार यांच्या पराभवाचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी रोहित यांच्यावर शरसंधान साधले. मावळच्या जनतेने ज्या प्रमाणे हिंमत दाखवत पार्थचे पार्सल परत पाठवले तशीच हिंमत कर्जत-जामखेडमधील जनता दाखवून देईल अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, जर कोणी या ठिकाणी येऊन साखर कारखानदारीच्या जोरावर शेतकऱ्यांना नागवत असेल तर आमचे नेते सुद्धा नवीन साखर कारखाने काढून ही मक्तेदारी मोडून काढतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिला. रोहित पवार विरूद्ध राम शिंदे असा सामना या मतदारसंघात रंगणार आहे.

हे पैसे कुणाचे? Innova कारमधून 30 लाख जप्त; निवडणुकीत पैशांचा खेळ!

रोहित पवार यांनी गेली काही वर्ष या मतदारसंघात बांधणी केली असून राष्ट्रवादीने पूर्ण ताकद इथं लावली आहे. रोहित हा पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा सरदार असल्यानं पवारांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. बोलण्यात आणि विचारात राहित यांच्यात शरद पवारांची छाप दिसते त्यामुळे त्याचा लोकांमधला कनेक्ट चांगला आहे. पण राम शिंदे हे गेली 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळ या भागात निर्माण झालंय. त्यामुळे त्यांचा मुकाबला करणं हे रोहित पवारांसमोरचं मोठं आव्हान असणरा आहे. तर राम शिंदे यांना या तरुण उमेदवारामुळे मोठं आवाहन निर्माण झालंय.

अमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केलीय. या आधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र कर्जत हा सगळ्याच दृष्टिने सुरक्षित मतदार संघ असल्याने त्यांनी कर्जतची निवड केली. लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांची उमेदवारी चांगलीच गाजली होती. पार्थ यांची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर रोहित यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यावरून मोठी चर्चा झाला होती. रोहित यांनी अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहियला नको होती. त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी थेट पवार साहेबांना सांगायला पाहिजे होतं असं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading