झीज टाळण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीला लावणार रासायनिक लेप

मूर्ती संवर्धनासाठी दहा वर्षापासून विठ्ठलाच्या महापूजा बंद करण्यात आल्या असून दही दुधाचा वापर कमी करण्यात आला आहे. आता लवकरच या प्रक्रियेसाठी निर्णय घेतला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 08:14 PM IST

झीज टाळण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीला लावणार रासायनिक लेप

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 13 सप्टेंबर : वारकरी संप्रदायातील जाणकार मंडळींना विश्‍वासात घेवून श्री विठ्ठल मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी त्यावर आणखी एकदा इपॉक्सी अर्थात रासायनिक लेप करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यासाठी मंदिरे समितीचे सल्लागार मंडळ तसेच विविध महाराज मंडळींची एकत्र बैठक घेवून त्यांचं या विषयावरचं मत जाणून घेतलं जाणार आहे. नंतर त्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचं औसेकर यांनी सांगितले.  पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी काही महिन्यापूर्वी संपूर्ण मंदिराची तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीची पाहणी केली होती. मूर्ती संवर्धन करण्यासाठी त्यांनी काही सूचना समितीस दिल्या आहेत.

'मनसे' निवडणूक लढविणार की नाही सस्पेंन्स कायम, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

त्यानूसार बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला होता. श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असल्याचं मानले जातं. याचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी मंदिरे समितीवर असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं औसेकर महाराज यांनी सांगितले.  यापूर्वी मूर्तीवर दोन वेळा या पध्दतीने रासायनिक लेप करण्यात आला होता. अ‍ॅड.शशिकांत पागे अध्यक्ष असताना नऊ वर्षापूर्वी ही असाच निर्णय घेण्यात आला होता. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली.

उदयनराजेंनी 'या' 2 अटींवरच घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय!

मूर्ती संवर्धनासाठी दहा वर्षापासून विठ्ठलाच्या महापूजा बंद करण्यात आल्या असून दही दुधाचा वापर कमी करण्यात आला आहे. आताही  अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने मूर्ती संवर्धन केले जाणार आहे. याबाबतचा ठराव करण्यात आला असून तो विधी व न्याय खात्याकडे पाठविला जाणार आहे. शासनाने यास परवानगी दिल्यावर यावर पुढील कार्यवाही होईल.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pandharpur
First Published: Sep 13, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...