अबब..! 25 हजार रुपयांची चप्पल, ग्रामपंचायत शिपाईने जोपासलाय अनोखा छंद

अबब..! 25 हजार रुपयांची चप्पल, ग्रामपंचायत शिपाईने जोपासलाय अनोखा छंद

तब्बल 25 हजार रुपये किंमतीची आणि सहा किलो वजनाच्या कातड्याच्या राजस्थानी चप्पल वापरणाऱ्या चांगदेव दावणे यांची परिसरात सध्या जोरदार चर्चा आहे.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,14 डिसेंबर: 'हौसेला मोल नसतं', अशी म्हण आहे. देगाव (ता.पंढरपूर) येथील छंदवेड्या चांगदेव नारायण दावणे यांनी ही म्हण तंतोतंत लागू पडते. ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम कार्यकत असणारे हरहुन्नरी चांगदेव दावणे यांनी असाच आगळावेगळा कातडी चप्पल घालण्याचा छंद जोपासला आहे. तब्बल 25 हजार रुपये किंमतीची आणि सहा किलो वजनाच्या कातड्याच्या राजस्थानी चप्पल वापरणाऱ्या चांगदेव दावणे यांची परिसरात सध्या जोरदार चर्चा आहे.

धीप्पाड शरीरयष्ठी, बहारदार व्यक्तीमत्व आणि झुपकेदार मिशी, असे व्यक्तिमत्व असलेल्या चांगदेव दावणेंना लहान पणापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चपला वापरण्याचा छंद आहे. अल्पशिक्षित असलेल्या दावणेंची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी पोटाला चिमटा घेत वेगवेगळ्या चपला वापरण्याचा छंद जोपासला आहे. यामध्ये चांगदेव दावणे त्यांच्याकडे असलेली 'नागीन चप्पल' परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

चप्पल वापरण्याच्या याच छंदातून दावणे यांनी 2004 साली तीन तळी (ठोकर) कातड्याची सहा किलो वजनाची चप्पल तयार करुन घेतली. यासाठी त्यांना जवळपास 25 हजार रुपयांचा खर्च आला. राजस्थानी माठाच्या या चपलेला त्यांनी आकर्षक पद्धतीने सजवले आहे. चपलेला सात नागफण्या काढल्या आहेत. म्हणूनच त्यांनी या चप्पलचं  नागीन चप्पल असे नामकरण देखील केले आहे. चप्पल घालून चालताना आवाज यावा म्हणून त्यांनी दोन्ही चप्पलांना शंभर घुंगरु लावली आहेत. इतकेच नाही तर अंधाऱ्या रात्रीत चप्पल चमकावी म्हणून संपूर्ण चप्पलांवर विविध रंगाचे बल्ब लावले आहेत. यासाठी त्यांनी लहान बॅटरीचा देखील वापर केला आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही त्यांनी हा आगळावेगळा छंद जोपासला आहे.

असे विविध छंद आजही खोड्यापाड्यात जोपासलेले दिसतात. यापैकीच चांगदेव दावणे यांचा राजस्थानी सहा किलो वजनाच्या कातडी चप्पलेच्या छंदाची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. असा हा आगळावेगळा छंद त्यांनी मनापासून आणि जीवापाड जपला आहे. या छंदा बरोबरच ते गावातील अनेक सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेतात. शिवाय गावातील तरुणांना ते व्यसनमुक्तीचा संदेश ही देतात. लहान मुलं आणि बायाबापड्यांमध्ये 'चांगामामा' म्हणून ते प्रचलीत आहेत. त्यांच्या या छंदाचा गावाकऱ्यांनाही तितकाच अभिमान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या