चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क होण्यासाठी बाप्पाला साकडं

देशाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क होऊन मोहिम यशस्वी व्हावी, यासाठी पंढरपूरमधील शिरगावकर कुटुंबाने चांद्रयानाच डेकोरेशन केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 04:39 PM IST

चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क होण्यासाठी बाप्पाला साकडं

पंढरपूर, 8 सप्टेंबर: गणेशोत्सव आला की अनेकांची उत्सुकता असते ती डेकोरेशनची. मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो घरगुती गणेशोत्सव. देशाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान मोहिमेतील विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क होऊन मोहिम यशस्वी व्हावी, यासाठी पंढरपूरमधील शिरगावकर कुटुंबाने चांद्रयानाच डेकोरेशन केले आहे.

आपल्या देशाची सुपर पॉवर देश म्हणून ओळख व्हावी, चंद्रावर यान पाठवणारा आपला भारत देश हा चौथा असणार आहे. 22 जुलै रोजी चांद्रयान-2 चा प्रवास सुरु झाला आणि सात सप्टेंबरला चांद्रयान-2 चा विक्रम लँडरचा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होताना संपर्क तुटला होता.

गणेशोत्सवाच्या काळात बाप्पा इस्त्रोच्या शास्त्रज्ञाना पावेल..

गणराया चांद्रयान 2 ला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे, असेच वाटते आहे. असा देखावा शिरगावकर कुटुंबाने आपल्या घरातील गणपतीसमोर साकारला आहे. मुंबईतील लालबागचा राजाने देखील यंदा साकारला आहे. दरवर्षी नवनवीन थीम घेऊन हे कुटुंब देखावे तयार करीत असते. मात्र यावेळी वेगळा देशांमधील चालू घडामोडीवर काहीतरी देखावा तयार करावा, म्हणून इंटरनेट सर्च केले. त्यामधून चांद्रयानाची कल्पना सुचली. मग शिरगावकर कुटुंबाने चांद्रयानाचा देखावा तयार करण्यास सुरुवात केली. चंद्रयान-2 चा देखावा हा पूर्ण इको फ्रेंडली आहे. यासाठी कोणतेही थर्माकोलचा वापर केलेला नाही. चांद्रयान तयार करण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागला. हे चांद्रयान -2 तयार करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य सहभाग झाले होते. एकंदरीतच देशातील चालू घडामोडीवर गणपतीसमोर देखावे केल्यामुळे मुलांना देखील त्या विषयामध्ये रस निर्माण व्हावा, मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व समाजामध्ये सामाजिक एकतेचा संदेश जावा हाच या मागचा उद्देश असल्याचे तनीषा शिरगावकर हिने सांगितले आहे.

कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...